मंगळवार, ३० नोव्हेंबर, २०२१

लोहपुरुष

 आपल्या  भारत  देशात  अनेक  सुंदर  प्रकल्प  आहेत. जे  खरंच  वाखाणण्या सारखे  आहेत.  त्यात  इतिहास कालीन  किल्ले आणि  मान्यवर  व्यक्तीचे  उभारलेले पुतळे  माझ्यासाठी  खूप  अचंबित  करणारी  आदर युक्त  गोष्टी  आहेत.  जगातील  सर्वात  उंच  म्हणजे  182 मीटर  उंचीचा  सरदार  वल्लभ भाई  पटेल  यांचा  पुतळा,  त्यांच्या  कार्याच्या  भव्यतेची  साक्ष  देणाराच  आहे.  20 हजार  चौरस मीटर  क्षेत्रा मध्ये  नर्मदा  नदीवरील  साधू  बेटावर हे  स्मारक  साकारलेले  आहे.  हे  फक्त  एक  स्मारक  नाही तर  एक  परिपूर्ण  प्रकल्प आहे  असे  म्हणता  येईल.  पुतळा  निर्जीव  असतो  हे सत्य  जरी असले  तरी हा  लोहपुरुष  आपल्या  भारत  देशाच्या  सक्षमते बद्दल बोलतो.  हे मात्र  खरं... अशा सजीव लोहपुरुषाला माझे शतशः  वंदन 🙏










शुक्रवार, २६ नोव्हेंबर, २०२१

MYSELF

 शाळेत  असताना आपण  एक  निबंध  लिहायचो.  " Myself  " स्वतः बद्दल  लिहताना थकत  नव्हतो.  आपले नाव, वय, आई चे नाव, वडीलांचे  नाव , आपले छंद,  friends  आणि आपला आवडता  विषय. Myself  निबंध  वाचताना  तेव्हा खूप छान  वाटायचे. पण जसे मोठे होत  जातो तसे  आपण अनेक  नात्यात  गुरफटून  जातो.  सगळी नाती  निभावतो पण  स्वतः शी असणारे  नाते मात्र  विसरून  जातो.  माझे पण थोडे असेच  झाले.  आज  स्वतः बद्दल माझ्याकडे सांगण्यासारखे फार  काही नाही.  एक मुलगी, बायको , आई  आणि गृहिणी असा सुंदर  प्रवास सध्या  चालू आहे. माझे छंद  जोपासण्याचा जमेल  तसा प्रयत्न  करते.  पण काहीतरी  आहे जे सापडत  नाही. ते म्हणजे या नात्यात हरवून  गेलेली मी. " Myself "





























उसंत

'मनाचा ब्रेक हा उत्तम ब्रेक' असे वाचण्यात आलेच असेल. त्यातला ब्रेक हा शब्द खूप महत्त्वाचा आहे. जसा गाडीच्या स्पीडला अधनं मधनं ब्रेकच...