🪔
अस्ताचलाकडे जाणार्या
सूर्यनारायणाने
निस्तेज होत जाणार्या
विश्वाकडे वळून पाहत
प्रश्न केला
' यापुढे माझे काम कोण करेल?'
कोणीच बोलले नाही.
तेव्हा ....
एक पणतीतील ज्योत
म्हणाली
' मी करीन , मी करीन ;
माझ्या कुवतीप्रमाणे ;
🪔
ही कविता कोणी लिहिली माहीत नाही. लहानपणी कोणत्या तरी पुस्तकात वाचली. पुस्तकाचे नाव काही आठवत नाही. पण कविता लक्षात रहावी म्हणून मी माझ्या डायरीत लिहून ठेवली. मनातल्या ... मनात असे पक्के ठरवले होते की सूर्य होता नाही आले तरी चालेल पण पणती होण्याचा प्रयत्न करायचा.
मला भावलेली एक सुंदर कविता असली तरी त्यात जीवनाचे सार आहे. सूर्य आणि पणती याची तुलना होवूच शकत नाही. कुठे तो प्रकाशमान सूर्य आणि कुठे ती छोटीशी मिणमिणती ज्योत असणारी पणती .... पण तरीही दोघांचे काम एकच आहे 'प्रकाश देणे ' फरक फक्त एवढाच की सूर्य सगळे जग उजळून टाकतो. आणि पणती घर , आजूबाजूचा परिसर , अंगणात असलेले तुळशी वृंदावन आणि देवघर तिचा प्रकाश मर्यादीत असला तरी ती अंधारात उजेडाचे काम करते.
मावळतीला जात असलेल्या सूर्याला ती दिलासा देते की तिच्या कुवती प्रमाणे ती तिचे काम करेन. निसर्ग आपल्याला हेच सांगत असतो की आपले काम प्रामाणिकपणे करत रहा. पण आजच्या जगात माणसे फक्त स्वतः साठी जगतात. त्यांना मला एकच सांगावेसे वाटते की एकमेकांचे पाय खेचण्या पेक्षा एकमेकांचे हात हातात घ्या. आणि माणसाशी ... माणसा सारखे वागा.
Eka numberr❤️❤️
उत्तर द्याहटवाSuperb. Good thought well explained.
उत्तर द्याहटवा