शनिवार, ११ डिसेंबर, २०२१

Respect

नाते  कोणतेही  असो  त्यात  मानसन्मान  नसेल  तर  ते  नाते  पोकळ  होवून  जाते.  "मानसन्मान " हा  खूप  जड  शब्द  आहे.  Actually  "Respect" हा  शब्द  एकदम  correct  आहे.   नवरा  आणि  बायको  चे  नाते  प्रेम  आणि  विश्वास  यावर  अवलंबून असले  तरी  सर्वात  महत्त्वाचे  आहे.. त्या  दोघांनी  एकमेकांचा  respect  करणे.  मनापासून respect  असेल  तर नात्याला  तडा  कधीही  जात  नाही. सासू आणि सुने  मधला  वाद  हा  तर  पूर्वी पासून  चालत  आला  आहे.  हा वाद  न संपणारा  आहे. पण  त्यात  प्रेमाचा  ओलावा  आणि  respect  असेल तर  मर्यादाच  कुंपण  आपोआप  तयार  होते  आणि  सासू  आणि  सून  त्या  कुंपणात  बागडत  राहतात.  फुलपाखरा सारख्या .... भाऊ  आणि  बहिणीचे  नाते  तर  मैत्रीच्या  पायावरच  उभे  असते.  पण  त्यात  थोडासा  respect  असेल  तर  ते सदैव  टवटवीत  राहते. आई  , बाबा  , मुलगा  किंवा  मुलगी  यांचे  नाते  तर जिव्हाळा  च्या  हिंदोळ्यावर  झुलत  असते.  या  नात्यात  तर  respect  असलाच  पाहिजे.  तरच  हे  संबंध  घट्ट  बंधना मध्ये  बांधलेले  राहतात,  कायमचे .... आता  नाते  राहिले  दीर ,  भावजय  आणि  नणंद  , भावजय  यांचे  .... थोडेसे  भाऊ  आणि  बहिणीच्या  नात्या कडे  झुकलेले  आणि  थोडेसे  आदरयुक्त  मैत्री  कडे  झुकलेले  असे  हे  गोड  नाते ...  
Respect  करणे  किंवा  न करणे  हा  ज्याचा  त्याचा  स्वभावाचा  भाग  आहे.  पण  नात्या मध्ये  फक्त  प्रेमालाच जपणे  गरजेचे  नाही.  तर  एकमेकांचा  respect  करून  एकमेकांचा  स्वाभिमान  जपणं ही  तितकंच  गरजेचे  आहे. 







५ टिप्पण्या:

उसंत

'मनाचा ब्रेक हा उत्तम ब्रेक' असे वाचण्यात आलेच असेल. त्यातला ब्रेक हा शब्द खूप महत्त्वाचा आहे. जसा गाडीच्या स्पीडला अधनं मधनं ब्रेकच...