माझ्या लहानपणी T V वर " बंदिनी " नावाची एक मराठी serial लागत असे. ती बघताना माझी आई नेहमी रडायची. स्त्री आणि तिची दुःख यांची छान सांगड घातली होती त्या serial मध्ये... लहानपणी आपण आपल्या कोषात असतो. त्यामुळे अशा गोष्टी पासून फार लांब असतो. दुनियादारी जेव्हा समजायला लागते तेव्हा अनेक लोकांना आपली काळजी वाटायला लागते. इथे जाऊ नको, मोठ्याने हसू नको, जास्त खाऊ नको, खाली मान घालून चाल, काम शिकून घे, केस घट्ट बांध, क्लिप लावू नको, सायकल शिकू नको असे सल्ले देणारे आमच्या आजूबाजूला खूपजण होते. गंमत म्हणजे त्यात जास्त बायकाच होत्या. आपण घडत असतो जसे आपल्या घरातली माणसे...आजूबाजूचे शेजारी आणि आपले नातेवाईक आपल्याला घडवत असतात. पण एक बाई दुसर्या मुलीला बाईपण शिकवत असते. मी तर म्हणेन की या बालपणा सोबत आपल्याला हे बाईपण मनात रुजवावे लागते. एक बाई दुसर्या बाईची मैत्रीण , आई, बहीण, सासू, सून, जाऊ, नणंद आणि भावजय अशा सर्व नाती अगदी योग्य पद्धतीने सांभाळते. एकमेकींना नावे ठेवणे, चुका काढणे, तुलना करणे, टोमणे मारणे, पाणउतारा करणे, चारित्र्यावर शेरेबाजी करणे, ईर्षा, मत्सर, द्वेष, ego हे अगदी बेमालूमपणे त्या करत असतात. पण जे बाईपण त्यांना वारसाने मिळाले आहे. ते बाईपण जपणं मात्र जमत नाही. बाईपण ..... हे फक्त आपण ...आपलं जपायचं नसतं तर ते दुसर्या बाईचं पण जपता आलं पाहिजे. जेव्हा हे जमेल तेव्हा बायकांचे अनेक problem solve होतील.
तुझं माझं करण्यापेक्षा
एकमेकांच्या होवूया ...
बाईपण जपता जपता
माणूसपण जपूया ...
Nice message. Keep going.
उत्तर द्याहटवाGood keep it up👌👍
उत्तर द्याहटवा👍🏻👍🏻
उत्तर द्याहटवाखूप छान विवेचन....!!
उत्तर द्याहटवाखूप छान विवेचन...!!
उत्तर द्याहटवा