गुरुवार, ६ एप्रिल, २०२३

संयम

काळ्या मातीत स्वतः ला पेरून  उगवण्याची वाट पाहणारा शेतकरी  म्हणजे संयम....
घरातल्या आपल्या माणसांचे राकट बोलणे अगदी सहजपणे पेलणं म्हणजे संयम....
उपवास असताना आपल्या आवडत्या पदार्थाकडे न पहाणे म्हणजे संयम....

माणसांमधे असा संयमी पणा असेल तर कोणतीही समस्या तो नक्कीच सोडवू शकतो. फक्त ते सोडविण्यासाठी त्याला थोडा वेळ द्यावा लागतो.  या वेळे मध्ये त्याला अनेक पर्याय सुचू शकतात. ज्याने माणूस आपली समस्या त्याच्या सोयीस्कर पर्यायाने सोडवतो.  आणि त्यामुळे त्याला मिळणारा आनंद कायमचा टिकतो. 
संयमी असणे...हा एक स्वभाव आहे. तो आणावा लागत नाही.  तो असावा लागतो. आमची आणि त्याआधीची पिढी ला अनेक ठिकाणी संयम बाळगावा लागला. कितीही कठीण परिस्थिती आली तरी आपला संयम ढळू न देता या पिढी ने अनेक आव्हाने पेलली. 

संयम हा शब्द आणि त्याचा अर्थ सध्याच्या ready to eat आणि fast food च्या जमान्यात मागे पडत चालला आहे. भरधाव वेगाने , कसलीही तमा न बाळगता गाडी चालवणार्‍या आजच्या generation ला वाट बघायला आवडत नाही.  Slow motion मध्ये त्यांना.... प्रमोशन नको आहे. त्यासाठी ते job बदलण्याचा निर्णय घेतात. एकमेकांशी स्पर्धा करण्याची सवय लागल्यामुळे  त्यांना लगेच इतरांपेक्षा लवकर श्रीमंत आणि यशस्वी व्हायचे आहे.  आजकालची ही पिढी जगण्यातली सहजता विसरून गेले आहेत. 

WiFi बरोबर आपल्या दिवसाची सुरुवात करणार्‍या आजच्या सगळ्या तरुणांना कोणतीही information अगदी सहज मिळते.  रांगेत उभे राहणे त्यांना आवडत नाही.  Booking Train,  flight,  cinema किंवा hotel चे असो...  ते online केले जाते.  Technology मुळे सगळे सहज...सोपे झाले असले तरी पट्कन गोष्टी available झाल्यामुळे ते जास्त practical होत चालले आहेत. Emotional होणे त्यांना आवडत नाही. 

संयम आणि सहनशीलता ही कमजोरी नसून ती मनाची खरी ताकद आहे.  जी सर्वांकडे नसते.  संयम हे एक युद्ध आहे.................. स्वतः विरुद्ध!


उसंत

'मनाचा ब्रेक हा उत्तम ब्रेक' असे वाचण्यात आलेच असेल. त्यातला ब्रेक हा शब्द खूप महत्त्वाचा आहे. जसा गाडीच्या स्पीडला अधनं मधनं ब्रेकच...