अरे संसार संसार , जसा तवा चुल्यावर , आधी हाताला चटके, मग मिळते भाकर ही बहिणाबाई ची कविता तिची संसारातील आपल्याला ओळख करून देते. घड्याळ्याच्या काट्यावर चालत असते ती... फक्त इतरांसाठी... सगळ्याच्या वेळा सांभाळता सांभाळता स्वतः ला वेळ द्यायचे विसरून जाते ती. चेहर्यावरची रेषही न हलता घरातल्या माणसांसाठी झटणारी ती, एखाद्या super women सारखी वावरत असते. असं नाही की हे सगळे ती मनाच्या वरुन करत असते. अगदी आनंदाने आणि प्रेमाने काहीही तक्रार न करता करते. ती घरातली सगळी कामे तर करतेच. पण बाहेरच्या जबाबदाऱ्या ही पार पाडते. प्रत्येकाच्या आवडीचे पदार्थ करते. घरच्या जेवणात तोच तोच पणा येवु नये म्हणून ती नेहमी जेवणात नावीन्य आणण्याचा प्रयत्न करते. त्याने तिची रोजची कामे वाढतात. पण एका शब्दाने तक्रार , चिडचिड करत नाही. वर्षभर साजरे होणारे सण , वाढदिवस, व्रत, उपवास, पाहुणे, समारंभ हे सर्व करताना ती पदर खोचून उभी असते.
मुलांचे projects , parents meeting, activity, exams, अभ्यास हे सर्व करताना मुलांबरोबर जणू काही तिची परीक्षा चालू असते. नवर्याचे mood सांभाळण्यासाठी तिला कधी त्याची मैत्रीण तर कधी त्याची आई पण व्हावे लागते. ती सून म्हणून कुठे कमी पडू नये याचीही तिला काळजी घ्यावी लागते. सासर चा भार उचलताना तिला माहेरची सावली ही सोडायची नसते. त्यामुळे तिथे ही जमेल तेवढा हातभार लावण्याचा प्रयत्न करते.
कधी ती अपमानित होते, कधी ती रागाला कारण होते, कधी तिच्यावर सगळी चिडचिड होते, तर कधी तिला गृहीत धरले जाते.
तिचे सगळे जग घरातच सामावलेले असते. सासर आणि माहेरच्या माणसातच ती स्वतःला शोधत असते. तिलाही प्रेम हवे असते. तिलाही वेळ हवा असतो. थकलीस! थोडा आराम कर... असा काळजी वाहू संवाद हवा असतो. तुला ही dish आवडते ना... चल आज खावुया ... असे तिलाही नवर्याने विचारावेसे वाटते. ' तुला काही मदत करू का? ' असे मुले बोलली तर तिचा आनंद गगनात मावेनासा होतो. चटका मनावर असला काय किंवा शरीरावर असला काय, त्यावर हळुवार प्रेमाची फुंकर कोणी दिली की त्याचा दाह कमी होतो.
तिलाही तिचे कौतुक केलेले आवडते. तिलाही खुश रहायला आवडते. तिलाही थोडीशी power nap ची गरज असते. ती ही थकते... ती ही खचते... ती ही चिडते... ती ही रडते... Plz तिला सांभाळा...